जलद वितरण

आता शिवाजी विद्यापीठांची पुस्तके मिळवा आपल्या घरी !!

सोपे आणि सुरक्षित

आपली पुस्तके सहज आणि सुरक्षितपणे खरेदी करा

विशाल संग्रह

पुस्तके विशाल संग्रह पासून निवडा

वैशिष्ट्यीकृत पुस्तके

 • Out of stock

  शिवचरित्र एक अभ्यास

  0 out of 5

  नामवंत लेखक, वक्ते आणि इतिहासकार श्रीयुत सेतुमाधवराव पगडी यांनी 1970 मध्ये शिवाजी विद्यापीठाने आयोजित केलेल्ल्या मराट्यांच्या इतिहासावरील व्याख्यानमालेत शिवचरित्र-एक आढावा असा विषय घेवून त्यावर आपले विचार मांडले. ही व्याख्याने मोठी औचित्यपूर्ण व लोकप्रिय झाली त्याचा हा पुस्तकरुपी ठेवा आहे.

  150.00
 • Out of stock

  मराठी पोवाडा

  0 out of 5

  शिवकालापासून आधुनिक काळापर्यंत चालत आलेला मराठी पोवाडा हा एक महत्वाचा वाडमय प्रकार आहे. मराठी पोवाडा आणि तो गाणारा व लिहिणारा मराठी शाहीर याचा महाराष्ट्राला सदैव अभिमान वाटावा, यात आश्चर्य नाही.  शाहिरी वाडमयाचा एक महत्वाचा प्रकार म्हणून पोवाडा विचारात घेतलेला असून लावणी व इतर पद्य प्रकारांहून त्याचे वेगळे वैशिष्ट्य स्पष्ट केलेले आहे. भिन्न-भिन्न कालखंडात पोवाड्याची ज़डणघडण कशी झाली व शिवकालापासून आधुनिक कालापर्यंत त्यात कोणकोणते विशेष दिसून येतात त्याचे विवेचन केले आहे.

  115.00
 • Out of stock

  श्री. शाहूंचे चरित्र

  0 out of 5

  प्रस्तुत शाहूचरित्र हे करवीर संस्थानचे प्रजाजन व संस्कृतचे गाढे पंडित कै. वासुदेव लाटकरशास्त्री यांनी राजाराम छत्रपतींच्या काळात सन 1939 साली प्रकाशित केले होते. या चरित्रग्रंथाची तीन चार वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे शाहू छत्रपतींच्या आद्यचरित्रांपैकी हे एक चरित्र आहे. दुसरे म्हणजे संस्कृत भाषेत लिहलेले हे पहिले व एकमेव पुस्तक होय. तिसरे म्हणजे या चरित्राचा लेखक करवीर संस्थानचा रहिवाशी असून त्याने शाहू छत्रपतींची कारकीर्द पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे.

  100.00
 • Out of stock

  शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार – कुलगुरु डाॅ. आप्पासाहेब पवार जीवन आणि कार्य (1 9 06 – 1 9 81)

  0 out of 5

  Shivaji University Publications

  140.00
 • Out of stock

  महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक : एक अभ्यास

  0 out of 5

  महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या संशोधन समितीच्यावतीने प्राचार्य य.ना. कदम यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक दर्जा व संघटन यासंबंधीची  महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची विचार जाणून घेण्यासाठी जी एक नमुना पाहणी केली, त्या पाहणीचा अहवाल पाहता असे दिसून येते की, महाराष्ट्रातील वयोवृद्धांना आपण केवळ एक वृद्ध नागरिक नसून, सन्मानजनक असे ज्येष्ठ नागरिकही आहोत याची जाणीव झाली आहे.

  110.00
 • Out of stock

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती गौरव ग्रंथ

  0 out of 5

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात एकाच वेळी एकाच दिवशी 125 व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्या व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे संकलन करून ग्रंथरुपात प्रकाशित करण्यात आली आहेत. बाबासाहेबांच्या अदभुत, अलौकिक कार्याची मीमांसा करणे, त्यामागील प्रेरणा व जाणीवांचा शोध व बोध घेण्याचा प्रयत्न करीत राहणे हे प्रत्येक अभ्यासकाचे कर्तव्य आहे.

  150.00
 • Out of stock

  कोल्हापूरच्या चित्र-शिल्प परंपरेचा १५० वर्षांचा इतिहास

  0 out of 5

  महाराष्ट्र आणि भारतात व परदेशात मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या कोल्हापूरच्या चित्रपरंपरेचा परिचय शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापक मंडळींना व्हावा. डाॅ. सुभाष देसाई यांनी या विषयांवर लेखन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर गड-किल्ले-पंचनद्या, तलाव, हिरवीगार वनश्री, एेतिहासिक वास्तू यांनी नटलेला आहे. कोल्हापूरच्या चित्रपरंपरेत आबालाल रेहमान, रावबहादुर धुरंधर, दत्ताेबा दळवी, बाबूराव पेंटर, चांगदेव शिगावकर, माधवराव बागल, बाबा गजबर, टी. के. वडणगेकर, जी. आर. वडणगेकर, रविंद्र मेस्त्री, जी. कांबळे, नागेशकर, पी.सरदार, चंद्रकांत मांडऱे अशा थोर चित्रकारांनी चित्रकला समृद्ध करत पुढे नेली आहे. कोल्हापूरच्या 150 वर्षांच्या परंपरेचे सचित्र दर्शन म्हणजे हे पुस्तक होय.

  135.00
 • Out of stock

  जिजाबाई कालीन कागदपत्रे

  0 out of 5

  या खंडात महाराणी जिजाबाई यांच्या कागदपत्रांचा हा खंड प्रसिद्ध होत आहे. या खंडात महाराणी जिजाबाई यांच्या कारकिर्दीशी संबंध असलेल्या 277 कागदांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. महाराणी ताराबाई ह्या अखिल भारतीय किर्तीच्या वीरांगना. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी यशस्वीपणे सामना करून त्यांनी आपले नाव इतिहासात अजरामर केले.

  230.00

नवीन आलेली पुस्तके