कलाविषयक पुस्तके

 • Out of stock

  कोल्हापूरच्या चित्र-शिल्प परंपरेचा १५० वर्षांचा इतिहास

  0 out of 5

  महाराष्ट्र आणि भारतात व परदेशात मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या कोल्हापूरच्या चित्रपरंपरेचा परिचय शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापक मंडळींना व्हावा. डाॅ. सुभाष देसाई यांनी या विषयांवर लेखन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर गड-किल्ले-पंचनद्या, तलाव, हिरवीगार वनश्री, एेतिहासिक वास्तू यांनी नटलेला आहे. कोल्हापूरच्या चित्रपरंपरेत आबालाल रेहमान, रावबहादुर धुरंधर, दत्ताेबा दळवी, बाबूराव पेंटर, चांगदेव शिगावकर, माधवराव बागल, बाबा गजबर, टी. के. वडणगेकर, जी. आर. वडणगेकर, रविंद्र मेस्त्री, जी. कांबळे, नागेशकर, पी.सरदार, चंद्रकांत मांडऱे अशा थोर चित्रकारांनी चित्रकला समृद्ध करत पुढे नेली आहे. कोल्हापूरच्या 150 वर्षांच्या परंपरेचे सचित्र दर्शन म्हणजे हे पुस्तक होय.

  135.00
 • Out of stock

  मराठी पोवाडा

  0 out of 5

  शिवकालापासून आधुनिक काळापर्यंत चालत आलेला मराठी पोवाडा हा एक महत्वाचा वाडमय प्रकार आहे. मराठी पोवाडा आणि तो गाणारा व लिहिणारा मराठी शाहीर याचा महाराष्ट्राला सदैव अभिमान वाटावा, यात आश्चर्य नाही.  शाहिरी वाडमयाचा एक महत्वाचा प्रकार म्हणून पोवाडा विचारात घेतलेला असून लावणी व इतर पद्य प्रकारांहून त्याचे वेगळे वैशिष्ट्य स्पष्ट केलेले आहे. भिन्न-भिन्न कालखंडात पोवाड्याची ज़डणघडण कशी झाली व शिवकालापासून आधुनिक कालापर्यंत त्यात कोणकोणते विशेष दिसून येतात त्याचे विवेचन केले आहे.

  115.00