-
टिळक आणि आगरकर यांचे राजकीय विचार
लोकमान्य टिळक व आगरकर या दोन्हीही मित्रांनी मराठी समाजापुढे समाजसेवेचे, त्यागाचे आणि लोकसेवेचे काही नवे आदर्श ठेवले. भारतात स्वराज्य स्थापन झाले पाहिजे कारण स्वराज्य हा प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी याबाबत टिळकांची भूमिका होती. आपल्या त्यागातून, आपल्यास झालेल्या विविध तुरुंगवासातून व आपणास भोगाव्या लागणाऱ्या त्रासातून स्वराज्याचे कार्य पुढे जात असेल तर आपण त्यास तयार आहोत अशी त्यांची भूमिका होती. लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त 2007 मध्ये आयोजित शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत जे महत्वाचे निबंध सादर करण्यात आले ते पुस्तक रुपाने प्रकाशित झाले.
-
हिंद स्वराज्य आणि आत्मबळाची प्राप्ती
म.गांधीनी ‘हिंदस्वराज्य’ या छोट्या पुस्तकात आपले जीवनविषयक तत्वज्ञान मांडले आहे. या पुस्तकातील सामाजिक व राजकीय विचारांचा नव्या पिढीस परिचय करुन देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या म.गांधी अभ्यास केंद्राने कार्यशाळा आयोजित केली होती. राज्यशास्त्रांचे ज्येष्ठ प्राध्यापक व म. गांधींच्या विचारांचे अभ्यासक डाॅ. चौसाळकर यांनी हिंदस्वराज्य वर दोन व्याख्याने दिली होती. प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाने विद्यार्थ्यांच्या मनात हिंदस्वराज्या चा आणि म.गांधीच्या इतर विचारांचा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होईल.