Product Tag - mahaveer adhyasan

  • Out of stock

    समृध्द चंद्रगिरी (महावीर अध्यासन)

    0 out of 5
    भगवान महावीर अध्यासनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या ग्रंथमालेतील हा तिसरा ग्रंथ होय. वर्तमान युगातील विज्ञाननिष्ठ मानवाला अध्यात्म व अहिंसेची नितांत आवश्यकता आहे. शांततामय आनंदी जीवनासाठी शाकाहाराची गरज आहे. वैचारिक स्वातंत्र्याकरिता अनेकांताची श्रेष्ठता सर्वश्रुत आहे आणि सामाजिक सलोख्यासाठी अपरिग्रह महत्वपूर्ण आहे. या सर्वांचे उद्गाता म्हणजे भगवान महावीर होत. तत्कालीन जनसामान्यांची भाषा प्राकृत-अर्धमागधी होती. या भाषेत दिलेला उपदेश आजही उपलब्ध आहे. म्हणून शिवाजी विद्यापीठातील भ. महावीर अध्यासन केंद्रातर्फे भ. महावीरांचे सिद्धान्त व त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या काही साहित्याचा परिचय करवून देण्याचा हा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे.
    170.00