निळे पाणी – पांढरी वाळू

200.00

अरबी समुद्राला स्पर्श करणारा महाराष्ट्राचा कोकण किनारा हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने नुसता देशातच नव्हे तर संपूर्ण जगात एक अत्यंत आकर्षक मोहात टाकणारा असा भौगोलिक भाग आहे. मराठी सारस्वतामध्ये अनेक कथा-कादंबऱ्या व कवितांमधून विशेषतः वि.स.खांडेकर, गो. नि. दांडेकर, य.गो.जोशी, मधु मंगेश कर्णिक, बा.भ. बोरकर यासारख्या साहित्यिकांच्या लेखणीतून कोकण किनारपट्टीचे अत्यंत मोहक पद्धतीने चित्रण झालेले आहे. बदलत्या काळाबरोबर अशा निसर्गरम्य प्रदेशाचा पर्यटन संदर्भ अधिकाधिक अर्थपूर्ण होत चाललेला आहे. कोकण किनारपट्टीच्या सौंदर्याचा नेमका वेध घेणारी आकर्षक प्रवासवर्णने संख्येने बरीच कमी आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता निळे पाणी- पांढरी वाळू हे प्रवास वर्णन या प्रकारच्या साहित्यात एक महत्वाची भर मानली पाहिजे.

Out of stock

  • Description

Description

लेखक-  बी. एस. पाटील 

किंमत रुपये ः 200.00

प्रथम आवृत्ती ः2006

 प्रकाशक ः डॉ. ए. ए. डांगे

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर